जागतिक कर्णबधिर दिन

 २७ सप्टेंबर



जागतिक कर्णबधिर दिन


कर्णबधिरता म्हणजे कानांनी ऐकू न येणे व बोलताही न येणे, या अपंगत्वाने त्या मुलाचा व पालकांच उत्साह, आशा पार मावळून जातात. साधारणतः स्त्रियांच्या गरोदरपणी तिला वेगवेगळी आजारपणे सोसावी लाग तर जन्याआधीच असे किंवा वेगळेही अपंगत्व येऊ शकते किंवा जन्मानंतर मुलाला ताप, गोवर, कांजिण्या, कटनात पाणी येणे किंवा कानावर काही आपात होणे यामुळेसुद्धा बहिरेपणा येऊ शकतो.


सर्वसामान्य मनुष्य जेव्हा ऐकतो, बोलतो त्यामुळे त्याच्या भाषासंपत्तीत वाढ होते. पण कर्णबधिर मुलाल ऐकूही येत नाही व तो बोलूही शकत नाही. अशी मुले-माणसे मग भाषा हाताने व्यक्त करतात आणि डोळ्याने करतात. यासाठी फक्त हातवारे उपयोगी पडत नाहीत तर अभिव्यक्तीसाठी चेहऱ्यावरचे हावभाव व अंगविक्षेपाचा या उपयोग होतो. खुणांची भाषा वापरताना मूल चेहरा, डोळे, डोके व शरीर याचा वापर करायला शिकले नाहीं स आकर्षक व प्रभावी अभिव्यक्ती होणार नाही.


त्यासाठी कर्णबधिरांसाठी विशेष शाळा निघाल्या आहेत. पालकांचा असा गैरसमज असतो की, ही मुझे काही करू शकणार नाहीत. पण हा गैरसमज प्रशिक्षित शिक्षकांनी दूर केला पाहिजे, त्यांनी पालकांना ही जाणीव करून दिली पाहिजे की अशी मुलेसुद्धा सामान्य मुलांच्या बरोबरीने सर्व काही करू शकतात. जेणेकरून पालक या मुलांकों जास्त लक्ष देतील व शिक्षणाच्या हल्ली निघालेल्या सर्व सोई उपलब्ध करून देतील. या मुलांमध्ये काहीतरी करन दाखवायची प्रचंड इच्छाशक्ती असते. त्यासाठी पालकांनी न्यूनगंड बाजूला सारून त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलीसुद्धा प्रोत्साहन, प्रशिक्षण दिले तर आपल्या पायावर उभ्या राहू शकतात. हे सर्व प्रबोधन पढ़ावेर कर्णबधिरांनाही उच्च जीवन जगता यावे म्हणून कर्णबधिर दिन दरवर्षी साजरा केला जाते.


कर्णबधिर मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांना 'विशेष शिक्षक' असे म्हणतात. या मुलांना शिकवणे फार कठीण जाते. प्रत्येक मुलाकडे लक्ष देणे व प्रत्येक गोष्टीची पुनरावृत्ती करणे खूप गरजेचे असते. सर्व विषयांसह शासनप्रणित भरतकाम, शिवण, हस्तकला, चित्रकला, संगणक इत्यादी व्यावयासिक शिक्षणही मुलांना दिले जाते. या मुलांमध एकाग्रता खूप असते त्यामुळे ती समाजात विश्वासाने वावरू शकतात व ओष्ठवाचन पद्धतीमुळे सर्व सामान्यांकडेक संवाद साधू शकतात. त्याहीपूर्वी असा दोष आढळताच मुलाचा तज्या ऑडिओलॉजिस्टकडून श्रवणलेख काढून घेत येतो व त्यानंतर मुलाच्या श्रवण-हासाच्या पातळीनुसार 'हियरींग एड' म्हणजेच श्रवणयंत्र वापरण्यास दिले जाते. मुलाला आवाज काढणे शिकवले जाते अशी वाचा शिकण्यासाठी काही कॉम्प्युटर सॉफ्टवेअर प्रोग्रॅमही उपलब्थ आहेत.


आपणही अशा मुलांकडे, व्यक्तींकडे केवळ दयेने किंवा कुत्सितपणे न पाहता त्यांच्यात धैर्य, आत्मविश्वास चिकाटी, खिलाडूवृत्ती, स्वावलंबन इत्यादी चांगले गुण कसे निर्माण होतील यासाठी सहकार्यशील राहायला हवे नाह का?

Comments

Post a Comment