श्राद्धपक्ष,महाळ

 भाद्रपद कृ.पक्ष 

श्राद्धपक्ष




भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्षाचा पंधरवडा श्राद्धपक्ष किंवा पितृपक्ष किंवा महालयपक्ष(महाळ)म्हणून  संबोधण्यात येतो. श्रद्धेने जी अंजली अर्पण करण्यात येते तिला श्राद्ध म्हणतात, हे दिवस म्हणाजे पूर्वजांच्या आणि  ऋषीमुनींच्या स्मरण - तर्पणाचे दिवस, ज्या पूर्वजांनी व पितरांनी आपल्या कल्याणासाठी रक्ताचे पाणी केले त्यासर्वाचे श्रद्धेने स्मरण करून ते ज्या स्थळी असतील तेथे त्यांना दुःख होऊ नये, सुख, शांती लाभावी यासाठी पिंडदान करायचे म्हणजे श्राद्ध.


तर्पण करायचे म्हणजे तृप्त, संतुष्ट करायचे, ज्या धर्म, संस्कृतीसाठी पूर्वजांनी स्वतःचे जीवन खर्च असेल त्यांचे विचार, धर्म, संस्कृती टिकवली, प्रतिष्ठा आपण वाढवली तर ते अवश्य तृप्त होतील. रोजचदेव पूर्व ऋषी तृप्त राहतील असे जीवन आपण जगले पाहिजे, त्यांच्या श्राद्वानिमित्त आपण आपल्या जीवनाचे आत्म केले पाहिजे व किती पुढे गेलो व कोणत्या चुका घडल्या याचा त्रयस्थपणे विचार केला पाहिजे.


काळाने जरी पूर्वजांचा, महात्म्यांचा नाश केला असला तरी त्यांची सुकर्म व आदर्श विचार यांनी य चिरंजीव बनवले आहे अशा धर्मवीरांचे, कर्मवीरांचे आपण कृतज्ञ भावनेने पूजन करून या दिवसात कृतकृत्याय असते.


भारतीय संस्कृतीची महानता, भव्य-दिव्यता ही थोर ऋषींची कर्तबगारी आहे, भावी पिढीने आनंदमय जगावे यासाठी स्वतः जळून लोकांनी जीवने ज्या ऋषींनी प्रकाशित केली त्या ऋषीचे ऋण फेडण्यासाठी त्यांच विचारांचा प्रसार केला गेला पाहिजे.


ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या आपल्या पितरांनी स्वतःचा स्वार्थत्याग करून निःस्वार्थपणे आप कल्याण साधले, असंख्य उपकार केले, त्यांच्या ऋणमुक्तीसाठी आपण काय केले पाहिजे याचा आढावा या पंचन दिवसांत घ्यायचा असतो. पित्याच्या अपूर्ण राहिलेल्या ध्येयाला पुढे घेऊन जातो तोच पित्याला तृप्ती देऊ शकतो श्राद्धाचे दिवस म्हणजे अटळ मृत्यूचा विचार करण्याचे दिवस, मृत पितर व त्रऋषी यांच्याप्रमाणे मलाही एक दिवस हे जग सोडून जायचे आहे याचे स्मरण श्राद्ध पक्षात ठेवून सत्कृत्ये व सदाचाराने जीवनाचा घट भरायला शिक पाहिजे.


श्रद्धेने होते श्राद्ध ! आज लोक श्रद्धेचे श्राद्ध करून बसले आहेत व मानवी जीवन भावनाशून्य यंत्रवत बरत आहे. म्हणून श्राद्धाची मस्करी केली जाते. विविध प्रकारे तर्कज्ञान लढवले जाते. पण भारताच्या बँकेत भरलेला पैस अमेरिकेतील चलनात प्राप्त होतो. दिल्लीमधला भाऊ मुंबईतल्या भावाबरोबर तश्याच आवाजात टेलिफोनवर गण्णा म शकतो तर भक्तिभावनेने, श्रद्धेने केलेले श्राद्ध पितरांना तृप्ती देणारे का ठरू नये? कृतघ्न बनलेल्या समाजाने कृटा व्हायला शिकले पाहिजे. आपण आपल्या पितरांना विसरलो तर आपल्या फोटोला तरी कोण हार, घालणार? आपण आपल्या पूर्वजांच्या प्रेमळ स्मृतींना व कर्तुत्वक्षणांना उजाळा नाही दिला तर आपले तरी गुणगान कोण गाणार बरे।


Comments