٢٤ सप्टेंबर
आंतरराष्ट्रीय ओझोन दिन
ऑक्सिजनचे ओझोन हे एक अपरूप आहे. ओझोनच्या रेणूत ऑक्सिजनचे तीन रेणू असतात, म्हणून त्याचे रासायनिक सूत्र o2, असे दर्शविले जाते. ओझोन हा ऑक्सिजनपेक्षा विक्रियाशील पदार्थ आहे. वस्तुतः ओझोन हा भस्मीकारक व ऊर्जा पुरवणारे साधन म्हणून प्रसिद्ध आहे. विद्युत मोटर व विजेमुळे होणारी वादळे या दोहोंच्या आजूबाजूस ओझोन अल्प प्रमाणात असतो.
पृथ्वीच्या पृषभागापासून १६ ते ३० किलोमीटर अंतरावर ओझोनचा एक थर असतो, या भागात ऑक्सिजनची धनता वातावरणातील इतर भागापेक्षा जास्त असते. याशिवाय पृथ्वीपृष्ठभागापासून या उच्चस्थानी ऑक्सिजनचे काही अणू स्वतंत्ररीत्या ऑक्सिजनच्या रेणूपासून तयार होतात, ऑक्सिजनचे अणू व रेणू ओझोनच्या घरामध्ये एकमेकांवर आदळतात. परिणामी ओझोन तयार होतो. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील वातावरणामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन, ऑक्सिजन आणि इतर वायू अल्प प्रमाणात असतात. परंतु स्टुटोस्फीअर (द्वितीय वायू स्तर) च्या बाहेरच्या बाजूस ओझोनच्या बराचा भाग असतो, त्यामध्ये ऑक्सिजनचे रूपांतर सतत ओझोनमध्ये होत असते,
तर हा ओझोनचा घर काय करीत असतो? सूर्यापासून निघणारी अतिनील प्रारणे पृथ्वीवर पोहोचू न देण्याचे कार्य ओझोनचा थर करीत असतो. सूर्यापासून निघणारी अतिनील प्रारणे ओझोनच्या घरात शोषली जातात हा ओझोनच्या बराचा महत्वपूर्ण फायदा आहे. दुसरा कोणताही पदार्थ वातावरणामध्ये ओझोनप्रमाणे अतीनील प्रारणे शोधू शकत नाही. ओझोनच्या थरामुळे ही अतिनील प्रारणे गाळली जातात त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीचे खूप फायदे होत आहेत.
जर हा ओझोनचा घर रिकामा झाला, विरला तर पृथ्वीवर सूर्याची अतिनील प्रारणे आदळतील व त्यामुळे नुकसान होऊ शकेल. भयंकर परिणाम जाणवत राहतील, वनस्पती, जलचर प्राणी, जीवजंतू यांचा नैसर्गिक समतोल ढळेल. कातडीचा कर्करोग व डोळ्यांवर सारा-पटलाची निर्मिती होऊ लागेल. आता तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणास हानी पोहोचत आहे. मोठमोठ्या कंपन्या, उद्योगधंदे, अणूचाचण्या, लहान-मोठी युद्धे, विविध प्रकारचे स्फोट यातून बाहेर पडणारे रासायनिक घातक पुराचे लोट या सर्वांमुळे ओझोनचा थर विरळ बनत चालला आहे, असा प्रकार अंटार्क्टिका भूखंडाच्या वरच्या भागात पडून तेथील ओझोन थराला मोठे भगदाड पडल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. पृथ्वीचे तापमान वाढून अंटार्क्टिकावरील बर्फ वितळू लागून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. तेव्हा पुढे काय महासंकट ओढवेल याने जागतिक विचारवंत चितित झाले. त्यामुळेच पर्यावरणाची हानी करणाऱ्याांविरुद्ध 'वसुंधरा परिषदेकडून व शास्त्रज्ञांकडून काही पावले उचलली जात आहेत. पृथ्वीभोवतालच्या ओझोन थराचे महत्व व अल्ट्राव्हायोलेट किरणांचे दुष्परिणाम ओळखून जगभर जागृती घडावी म्हणून १६ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय ओझोनदिन साजरा होतो.
Comments
Post a Comment