लालबहादूर शास्त्री जयंती

 

2 ऑक्टोबर

लालबहादूर शास्त्री जयंती



'मूर्ती लहान पण कीर्ति महान' ही म्हण सिद्ध करणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांचा जन्म उत्तर गंगेच्या काठावरील मुगलसराई या गावी २ ऑक्टोबर १९०४ मध्ये झाला. शारदाप्रसाद श्रीवास्तव वडील, शास्त्रीजी लहान असतानाच निवर्तले, त्यांची आई रामदुलारीदेवी नंतर माहेरी परत आली. तेथे आजोबाकडे शास्त्रीजी लहानाचे मोठे झाले.

प्राथमिक शिक्षणानंतर गंगेच्या पलीकडील काठावर असलेल्या हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये शास्त्रीजीनी प्रवेश केला. घरच्या अत्यंत गरिबीमुळे शिकताना आलेल्या अनंत अडचणीवर शास्त्रींनी मात केली, शाळेत होडीने जावे लागे पण काही वेळेला पैसेच  नसल्यामुळे ते पोहून पलीकडे जात पण शाळा बुडवीत नसत. शांत, अबोल असनारे  शास्त्रीजी मनापासून अभ्यास करत. दुसऱ्या मुलांच्या शिकवण्या घेऊन, रोज पायपीट करून ते पदवीधर झाले पहिला नंबर मिळवून त्या वेळची त्यांनी 'शास्त्री' ही पदवी घेतली.

त्यावेळी भारतात ब्रिटिशांची सत्ता होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे म. गांधी, पुरुषोत्तमदास टंडन, लाला लजपतराय, नामदार गोखले इत्यादी नेत्यांचा शास्त्रीजीवर प्रभाव पडून ते देशसेवेत, असहकार चळवळीत भाग घेऊ लागले, लोकोपयोगी सार्वजनिक संस्थांचे ते सभासद झाले. त्यांची कामाची आवड व चिकाटी पाहून नेहरूनी एकदा म्हटले, "प्रामाणिकपणा व मनःपूर्वकपणा यांचे नाव लालबहादूर शास्त्री !"

नोकरी न करण्याचा निश्चय करून शास्त्रींनी 'लोकसेवक समाज' संस्थेद्वारे अस्पृश्योद्धाराचे काम सुरू केले. स्त्रियांचे स्वावलंबन व अस्पृश्यांना नवी संधी मिळण्यासाठी ते झटले. कायदेभंगाची चळवळ, भारत छोडो आंदोलन  यामध्ये टिळक, गांधींप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन शास्त्रीजीनी १९३० ते १९४५ या काळात सात वेळा तुरुंगवास भोगला. तुरुंगातही त्यांनी हगल, हेरॉल्ड, टॉलस्टॉय, हक्सले यांच्या ग्रंथांचे वाचन केले. 'मादाम क्युरी' यांच्या चरित्राचे हिंदीत रूपांतर केले. १९४२ च्या लढ्यावर पुस्तक लिहिले.

शास्त्रीजींना प्रसिद्धी आवडत नव्हती, त्यांना पैशाचा अत्यंत तिटकारा होता. तुरुंगात असताना आपल्या आजारी मुलीला भेटायलाही त्यांनी सरकारकडे याचना केली नाही. याच काळात देश स्वतंत्र झाल्यानंतर ते रेल्वेमंत्री  झाले. त्यावेळी प्रवाशांना सुखसोई उपलब्ध करून दिल्या. याच काळात अरियालुरला झालेल्या प्रचंड अपघातात   शास्त्रींचा काहीही संबंध नव्हता तरीही त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

दळणवळण खात्याचे मंत्री, व्यापार व उद्योग मंत्री व गृहमंत्री अशी अनेक पदे शास्त्रींनी भूषविली. शेतीची औद्योगिक परिस्थिती सुधाण्यासाठी योजना आखल्या. भाषिक प्रश्न सोडवले. १९६४ साली शास्त्रीजी नेहरूनंतर पंतप्रधान झाले. वाढत्या जबाबदाऱ्यांबरोबर लोकांचे दुःख ते आपलेच समजून शास्त्रींनी अहोरात्र कष्ट केले. 1965- साली पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. या गंभीर परिस्थितीला धैर्याने  तोंड देताना शास्त्रीनी 'जय जवान किसान' ही घोषणा दिली, राजकीय वाटाघाटीसाठी शास्त्रीजी रशियातील 'ताश्कंद' ला गेले. तेथील शांतीसाठ झालेल्या 'ताश्कंद करारा'वर सह्या झाल्यानंतर, १० जानेवारी १९६६ ला शास्त्रीजींचे हृदयविकाराने निधन राष्ट्रपतींनी 'भारतरत्न' पदवी देऊन त्यांच्या महान कार्याचा गौरव केला.

Comments