मानसिक आरोग्य दिन

 १० ऑक्टोबर


मानसिक आरोग्य दिन




'मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण ।।' असे तुकारामांसारख्या अनेक संतांनी प्रसन्न, उल्हासित, निरोगी मनाची महती गायिलेली असली तरी आज १०० नागरिकांपैकी ३० ते ४० व्यक्ती कोणत्या ना कोणत्या निराशेने, तणावाने ग्रासलेल्या असतात. त्यांना आपल्या जीवनात रस वाटत नाही. जीवन निरर्थक व नकोसे वाटते. उदास वाटणे, छातीत धडधड होणे, विस्मरण होणे, सतत डोके दुखणे, स्वतःशीच हसणे, बडबड करणे, अवास्तव राग येणे, सतत चिंताग्रस्त राहणे, आत्महत्येचे, पटस्फोटाचे विचार मनात येणे अशी ही अनेक लक्षणे मानसिक रोगाची असू शकतात.


पण हे मानसिक विकार भूतपिशाच्यामुळे, बाहेरची बाधा किंवा करणी केल्यामुळे होतात अशा प्रकारचे अज्ञान आणि अंधश्रद्धा समाजामध्ये आढळतात. त्यामुळे चेष्टा व उपेक्षाच रुग्णांच्या वाट्याला येते. परंतु मनोरुग्णालये किंया मनोविकारतज्ज्ञांकडे यावर उपाय होऊ शकतो, हे सर्वांनी ध्यानात ठेवून उपाय सुरू केले तर आपल्याच जवळची कोसळणारी, निराशेच्या गर्तेत जाणारी, जीवनेच्छा नष्ट झालेली व्यक्ती सर्वांच्या सहकायनि सुधारू शकतेः शिवाय वातावरणातील बदल, सहलींमधूनही मनाला टवटवी लाभते पण हा उपाय तात्पुरता ठरतो. त्यापेक्षा रोजच्या व्यवहारात विनोदाची पखरण केल्याने आयुष्य प्रफुल्लित सुगंधित होऊ शकते.


आपले मानसिक आरोग्य खरे तर आपणासच राखावे लागते. कारण मनाच्या अस्वस्थतेला आपणच जबाबदार असतो. उदा. नैसर्गिक आपत्ती, म्हातारपण, एखाद्याचे निधन, चंद्यातील नुकसान असो वा शेतीतील असो ह्यासारखे परिस्थितीतले होणारे बदल असतात ते आपल्या नियंत्रणाखाली नसतात. किंबहुना त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही. म्हणूनच आयुष्यात घडणारे अनपेक्षित प्रतिकूल बदल शांतपणे स्वीकारावेत. या प्रतिकूलतेत किंवा निराशामय वातावरणात शरीरावर व मनावर जखमा करून घेण्यापेक्षा स्वतःला व इतरांना कमीत कमी त्रास होईल असे वागणे महत्त्वाचे ठरते. कोणतेही आलेले दुःख हे प्रक्षुब्ध होऊन स्वीकारले तरी स्वीकारावेच लागते. आपला राग, आक्रस्ताळेपणा ते दुःख टाळू शकत नाही म्हणूनच ते शांतपणे स्वीकारून स्वतःच्या मनाचे, शरीराचे व इतरांचे होणारे नुकसान टाळावे.


ताणतणाव व निराशाजनक गोष्टींमुळे मानसिक आरोग्य तर बिघडतेच पण हृदयाला प्राणवायूचा पुरवठा कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, निद्रा व अंतग्रंथीमध्ये दोष निर्माण हाडाच्या घनतेमध्ये तसेच रक्तघटकामध्ये ही अपायकारक बदल घडून येतात. म्हणूनच उत्तम मानसिक आरोग्य राखण्यासाठी कशाचाही अतिरेक करता कामा नये; मोह-माया-लोभ-मत्सर-राग द्वेषाला लांब ठेवता आले पाहिजे. दुराग्रह-खोट्या प्रतिष्ठा अहंकार टाळावेत. वास्तव स्वीकारावे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा. नेमके 'जगणे'च बाजूला ठेवून माणसे टेन्शन्स, चिंता, धावपळीत अवास्तव मप्र राहतात. सकारात्मकतेला हरवून टाकून ऑवनातली निरर्थकताच शोधून काढतात तेव्हा मानसिक आरोग्य दिन साजरे करण्याची वेळ येते खरी ।

Comments